(प्रामाणिकपणे आंदोलनात सहभागी झालेल्या आणि तितकच प्रामाणिक जगणार्या सर्वांची माफी मागून........)
कॉलेज कट्टापहिला - काय सही वाटलं ना यार मोर्चात घोषणा देताना. आपण तर असला कल्ला कधी केलाच नव्हता. चला आता मस्त picture टाकू. सिंघमला जाऊ.
दुसरा - अरे पण house full चाललाय ना. मिळत नाहीयेत तिकीट.
पहिला - मग black नी घेऊ. मला माहितीये एक पोरगा, तो बरोबर देईल आपल्याला.
कोणतही निमसरकारी / असरकारी कार्यालय
पहिला - काय राव, कुठेय तुमचा पत्ता? अरे इथे आपल्या गावात आंदोलन जोरात चाललंय. तू कुठे आहेस?
दुसरा - च्यायला काय सांगू राव. रजा मिळेना झालीये. साहेबाला विचारलं तर म्हणतो महत्वाची मीटिंग आहे पुढच्या आठवड्यात त्याची तयारी करा. आधी आपली कामं नीट प्रामाणिकपणे करा म्हणे आणि मग भ्रष्ट्राचाराविरुद्ध लढा. आमचा साहेब म्हणजे एक कटकट आहे साली.
पहिला - म्हंजे अरे आपल्या गावातल्या कमिटीचा चेअरमन ना? मोक्याच्या वेळी गैरहजर? घ्या पायावर मारून धोंडा. बाकीचे बसलेच आहेत संधीचा फायदा घ्यायला. चांगलं coverage मिळतंय पेपरात.
दुसरा - बरं मग असं करतो, निघून येतो तिकडे आणि साहेबाला कळवतो टायफाइड झाला म्हणून.
NGO
मॅडम मैत्रिणीशी बोलत आहेत. "काल मोर्चात दिसली नाहीस? की mail वरच पाठींबा दिलास? आमचा बाई सगळा ग्रुपच गेला होता. आपण कसे अगदी सामाजिक कामातले पडतो न? मग जायला नको का अशा ठिकाणी...."
तेवढ्यात त्यांचा सहकारी येऊन संभाषणात व्यत्यय आणतो. "ते मागच्या आठवड्यात गावात येऊन ज्यांनी session घेतलं त्या बाईंच्या विषयाचा आपल्या कामाशी काही संबंध नाही असं वाटतंय. मग आपण आपल्या प्रोजेक्ट मधून त्यांचा खर्च का करायचा?
मॅडम - मोठ्या साहेबांनी त्या बाईना पाठवलं होतं. त्यांचे संबंध वेगळे आहेत. त्यांच्या गाववाल्या पडतात न त्या.
सहकारी - पण मॅडम असं करणं चुकीचं नाही का?
मॅडम - हे बघा ज्या अर्थी साहेबांनी सांगितलंय त्या अर्थी ते करायला हवं. शिवाय त्यांनी त्यांच्या भाषणात आपल्या कामाचा उल्लेख केलाच न? आणि लोकांनी या कामाचा कसा फायदा करून घ्यायला हवा हेही त्या बोलल्याच, मग आपल्या कामाला उपयोग होणारच न त्याचा?
सहकारी - पण मॅडम....
मॅडम - हे बघा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर माझ्याकडे नाहीत. सध्या तुम्ही सांगितलंय तेवढं करा.
सरकारी कार्यालय
गृहस्थ - काय भाऊसाहेब 'तुम्ही' इकडं कुठ?
भाऊसाहेब - आलो मेणबत्ती लावायला!
गृहस्थ - 'तुम्ही' आणि इथे मेणबत्ती लावणार?
भाऊसाहेब - मग आम्ही काय मेणबत्ती लावू नाही की काय?
गृहस्थ - बर ते आपल्या कागदपत्रांच कुठवर आलं?
भाऊसाहेब - होईल, होईल. बरं का, तुमच्या भाच्याला engineering ला payment seat ला admission मिळतेय. तेवढी त्याची सोय करून टाका म्हणजे झालं.
गृहस्थ - अहो भाऊसाहेब माझा भाचा अजून शाळेत शिकतोय...
भाऊसाहेब - अहो माझा मुलगा म्हणजे तुमचा भाचाच......
कुठलही खातं / ऑफिस / क्षेत्र
प्रशिक्षणार्थी १ - काय भाषण ठोकलयस तू अण्णांच्या आंदोलनावर!
प्रशिक्षणार्थी २ - मग काय, आपण बोलायला कुणाला ऐकत नाही.
प्रशिक्षणार्थी १ - हे संयोजक पण काय वाटेल ते विषय ठेवतात चर्चेला
प्रशिक्षणार्थी २- जाऊ दे. तू येतोयस का सांग. तालुक्याच्या गावी आलोय. ४-५ तर कामं घेऊनच आलोय. एका दगडात दोन पक्षी.
प्रशिक्षणार्थी १ - आणि प्रशिक्षण?
प्रशिक्षणार्थी २ - अरे येऊ की जेवणाच्या वेळेपर्यंत दीड-दोनला.
रोज सर्वसामान्यांच्या आयुष्यात येणारा वाहतुकीचा रस्ता
पोलीस - थांबा ओ काका. इथे नो एन्ट्री आहे.
काका - आज काय टार्गेट दिसतंय दिलेलं साहेबांनी? रोजच जातो की रे मी इथूनच. मग किती गोळा करायला सांगितलेत आज?
पोलीस - अहो, निदान भ्रष्टाचाराविरुद्ध इतकी जोरदार लढाई चालू असताना तरी असं बोलू नका.
काका - मग मी पण दिलाय हं पाठींबा sms करून. साल्या सगळ्या भ्रष्टाचारी पुढार्यांना फासावर टांगायला पाहिजे. बरं मग आपलं कितीमध्ये तोडताय़ बोला? !!!
शेवटी एक कोकणी प्रतिक्रिया
खंय जातंय त्या मोर्चाक. त्यान काय आपणाक रेशन वेळेवर मिळतलो की शितं फुकट मिळतलॊ?
खंय जातंय त्या मोर्चाक. त्यान काय आपणाक रेशन वेळेवर मिळतलो की शितं फुकट मिळतलॊ?
एकदम 'पुणेकर' प्रतिक्रिया आहे वास्तवावरची - पण सुदैवाने 'मी अण्णा आहे' अशी टोपी न घालणारे लोकही प्रत्यक्षात सगळ तत्त्व आचरणात आणायचा प्रयत्न करतात असाही अनुभव आहे. म्हणजे एकंदरीत हिशोब ठीक राहतो म्हणायचं शेवटी!
ReplyDeleteU have written common man's approach.......it is realistic ...Have U read Mr Atul Kulkarni's article in Loksatta - 11th Sept 11............good article...........How we should b one of the part of the system instead of only talking & discussion- ahslesha
ReplyDeleteखौटपणाने बोट ठेवले आहे. अशी आणि निरनिराळ्या प्रकारची रास्त टीका आंदोलनावर झाली. तरीही त्यात काही महत्वाच्या चांगल्याही बाजू होत्याच. आणि शेवटी लोकांची deviations आणि सत्ताधारी मंडळींची deviations यातही फरक केला पाहिजे. वरती फारच नासलय यात शंका नाही. त्यामानानं मध्यमवर्गियांची तुटपुंजी उर्जा खाणारे traffic violations, चिरीमिरी वगैरे किरकोळच.
ReplyDeleteसविता, अश्लेषा आणि संग्राम, प्रतिक्रीयेबद्दल धन्यावाद!
ReplyDeleteसविता टोपी घालून आणि न घालता आंदोलनाच्या विचाराने वागणार्यांची संख्या वाढायला हवी म्हणजे हिशेब या अर्थाने न जुळेनासा होईल तो दिवस यायला हवा खरंतर.
अश्लेषा मी ते वाचलेलं नाही पण वाचेन नक्की.
संग्राम ही आंदोलनावरची टीका नाही खरं तर. ही वागण्यातल्या विसंगतीवरची आहे मग ती कोणाच्या का वागण्यातली असो. सामान्य माणसाच्या किंवा राजकारण्य़ांच्या. तुला असं नाही का वाटत की प्रत्येक माणसाच्या वागण्यातली ही विसंगती जितकी कमी होत जाईल तितका त्याचं आणि अशा आंदोलनाचही नैतिक बळ वाढत जाईल?
Bhavekaka says
ReplyDeleteIn Indian democracy that was the only way , Anna could have protested. Now selfish people will always mix in such movement along with selfless people. Even in movements of tribal development who are the funding agencies to NGOs is well known. As per the Company law 1 % of their profits are to be funded to trusts for social cause. Unless you earn nice amount you can not mobilize the fund. To earn nice amount what normal practices are required is known to all. So some times goal are to to be reckoned and not the means (Which is against the principle of Gandhiji ) You care for values hence this reply.
With lots of regards.
Bhavekaka
Bhavekaka, thanks for responding. Pl note that I don’t have any objection or doubt about the way of protesting. I’m not criticizing the movement, I’m just pointing out inconsistency in personal and social lives. The lack of integrity is the root of the whole problem.
I don’t agree with your opinion that means should be ignored to achieve the goals. Short term success could be achieved with wrong means but sustainable long term conquer is possible only by pure means.