Tuesday, February 22, 2011

गोष्ट लाकूडतोड्याची - विकासयुगातली
आपल्याला माहितच आहे की देवांच प्रोफ़ेशन म्हणजे प्राणिमात्रांचे कल्याण. बिचारे आपल्या   मार्गांनी वर्षानुवर्ष, युगानुयुगं मानवांचं कल्याण करत आलेच होते आणि स्वतःवर संतुष्ट होते. पण अचानक एके दिवाशी या देवांच्या नगरीत खळबळ माजली. पृथ्वीला visit  देऊन नारद आले ते थेट लोककल्याणात पहिला नंबर असणार्‍या शिवाकडेच गेले आणि त्यानंतर विष्णूकडे. आता शिव आणि विष्णू दोघांच्यातही कोण चांगल्या पद्धतीने आणि जास्तीत जास्त लोककल्याण करतो याबाबत स्पर्धा. शिव regularly  गरजू लोक शोधत फेर्‍या टाकणारा तर विष्णू अधून-मधून पृथ्वीवर घाऊक प्रमाणात लोककल्याण टाकणारा.

'तुम्ही दोघही कुचकामी लेको. अगदी remedial approach आहे तुमचा. Root cause ला मुळीच हात न घालणारा आणि शब्द कसले वापरता तर म्हणे लोककल्याणयातूनच तुमचा outdated  असा charity based appraoch दिसून येतोय. तुम्ही काय भलं करणारं लोकांचं? जरा पृथ्वीवर बघा काय काय चाललय आणि शिका जरा शहाणपण माणसाकडून.’


बिच्चारे शिव आणि विष्णू पुरते गोंधळून गेले. त्यातल्या त्यात शिवाने  शांतपणे, पडत्या स्वरात विचारलं, ’अरे, नारदा, हे आंग्ल भाषेतले अपरिचित शब्द वापरून आमच्या लोककल्याणाला नावं का ठेवत आहेस? जरा सविस्तर समजावून सांगशील का?’

त्यानंतर नारदाने जे एक मोठ्ठे lecture  दिले त्यातून शिव व विष्णू यांचे चांगलेच प्रबोधन होऊन आपल्या मागासलेपणाच्या जाणिवेने त्यांचे डोळे खाडकन उघडले. नारदाच्या lecture चा सारांश असा होता की पृथ्वीवर माणसाने माणसाचच भलं करण्याच्या गोष्टीचा भरपूर अभ्यास करुन त्याचं एक शास्त्र तयार केलय. यांत वेगळेवेगळे सिद्धांत, तत्व, पद्धती, साधन इ. शोधून काढलय आणि इतकच नाही तर हे शास्त्र शिकवण्याची विद्यापीठही ठिकठिकाणी अमाप उगवून आली आहेत. या शास्त्रानुसार लोककल्याण हा कालबाह्य शब्द असून समाजविकास हा कालमान्य शब्द आहे.


शिव आणि विष्णू या दोघांनाही जाणीव झाली की लोकांचं भलं व्हावं या एका इच्छेखेरीज आपल्या समाजकल्याणाच्या मागे कोणताही सिद्धांत वा तत्त्व वा पद्धतीचा विचार नव्हता. दोघांनाही स्वतःची लाज आणि मानवाचा आदर वाटला. या दोघांच्या आग्रहावरुन इंद्राच्या दरबारात प्रस्तुत विषयाची जोरात चर्चा होऊन सर्व देवांना समाजविकासाच्या रीतसर प्रशिक्षणाची आवश्यकता मान्य करण्यात आली. त्यासाठी पृथ्वीवरून समाजविकासाचे उत्तम प्रशिक्षण देणारी विद्यापीठे शोधून काढण्यासाठी एक standing committee नेमण्यात आली. या कमिटीने प्रदीर्घ काळ अभ्यास  करून विद्यापीठांची एक यादी तयार केली. त्यानुसार सर्व देवांना निरनिराळ्या विद्यापीठात प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले.

देवांजवळ graduation ची degree नसली तरी त्यांचा लाखो वर्षांचा अनुभव, जनमानसातील त्यांच्याबद्दलचा आदर आणि त्यांची अमानवी बुद्धिमत्ता यामुळे त्यांना M. S. W. ला प्रवेश देण्यात आला. दोन वर्षांच्या course नंतर देवांना खूपच enlightened झाल्यासारखे वाटले आणि एका नव्या जाणिवेने देवलोकातील लोककल्याणाचा छे, छे समाजविकासाचा कारभार सुरू झाला.

नव्या अभ्यासाच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक कामाची जबाबदारी स्वतःच्या टाळक्यावर घेण्यापेक्षा local talent tap करुन जबाबदार्‍या स्विकारण्यास तयार करणे हे उत्तम कामाचे लक्षण होय. त्यामुळे अलिकडे देवादिक गरजू, दुःखी लोकांच्या शोधाकरता स्वतः फेर्‍या न मारता local resource person's teams develop करू लागले होते. भगवान शिव local resource persons (LRPs) ना  systematic training  देण्याची कामगिरी करत होते. त्याच्या Child Development Dept.  चे प्रमुख पद पार्वती सांभाळत होती. भगवान विष्णूने अनेक वर्षांची परंपरा असलेला वारकरी संप्रदाय हीच आपली LRP team  असल्याचे जाहीर केले होते आणि त्याच्या पुरोगामित्त्वाबद्दल आभास निर्माण करण्याचा एक प्रयत्न चालविला होता. पण या पारंपारिक LRPs ना आधुनिक प्रशिक्षण कसे द्यावे या विवंचनेत सध्या तो होता.

शिवाने आपल्या LRPs ना field work साठी क्षेत्र वाटून दिली होती. या LRPs वर supervision करण्याकरता काही supervisors  नेमले होते आणि या supervisorsवर स्वतः शिव supervision  करणार होते.

---------------------------------------------------------------------------------------
तर या LRPs पैकी एक LRP एके दिवशी आपल्या क्षेत्रात field work करत फिरत असताना त्याला एक लाकूडतोड्या विहिरीच्या काठावर बसून रडताना आढळला. LRPने विचार केला, ’इथे नक्कीच problem situation आहे. Case work चा chance दिसतोय.’ Social work theory नुसार LRP ने (जो लाकूडतोड्याला देवदूताच्या रूपात दिसला म्हणून आपण त्याला देवदूत म्हणू) लाकूडतोड्याला प्रथम थोपटून, उगी करून, पाणी देऊन physical  आणि verbal contact ने comfortable  वाटायला लावले आणि मग मूळ प्रश्नाला हात घालत तो विचारता झाला, ’हे लाकूडतोड्या, तू का रडतोस?’ लाकूडतोड्या रडत रडत म्हणाला, ’ देवा, माझी कुर्‍हाड हिरीत पडली.’


देवदूताला अजूनही कुर्‍हाड विहिरीत पडल्यामुळे नक्की काय problem situation निर्माण झाली ते लक्षात येईना म्हणून अधिक prob  करण्याच्या हेतूने तो म्हणाला, ’अरे, कुर्‍हाडच पडली ना, तू तर नाही ना पडलास. मग बरंच समज की.’ लाकूडतोड्या पुन्हा रडत रडत म्हणाला, ’ देवा, कुर्‍हाड पडली म्हंजे मीबी हिरीत पडून मेल्यावानीच झालो जनू. कुर्‍हाड न्हाई तर लाकडं कशाची तोडू? लाकडंच न्हाईत तर इकू काय आनि पोटाला खाऊ काय?’

देवदूताने मनातल्या मनात मांडणी करून विचार केला आणि ताबडतोब त्याच्या लक्षात आले, अर्थिक प्रश्न आहे. Problem of resource of production. मग उत्तर काय - mobilization of resources! पण यातही दोन पर्याय आहेत. ) पारंपारिक उत्पादनाचे साधन मिळवणं  २) नवीन उत्पादनाचं साधन निर्माण करणं

देवदूताने आजूबाजूला जंगलात, विहीरीवर नजर फिरवून पाहिली. शेती, मासेमारी, animal husbarndary, horticulture अनेक पर्याय देवदूताच्या मनात येऊन गेले पण यापैकी कशासाठीही पुरेशी साधनं उपलब्ध नाहीत आणि लाकूडतोड्याकडे असलेल्या कौशल्याचा विचार करता पारंपारिक साधन मिळवून देण्याचा पहिलाच पर्याय योग्य आहे असा निर्ष्कष त्याने काढला.

आपण उपाय शोधला आणि ठरवला तरी तो लोकांना एकदम सांगायचा नसतो.  Social work च्या theory  नुसार लोकांकडून तो काढून किंवा वदवून घ्यायचा असतो. त्यानुसार planning  मध्ये लाकूडतोड्याचा सहभाग घेण्याच्या उद्देशाने देवदूताने त्याला विचारले,’बरं मग, आता काय करायचं?’ ’आता काय करनार देवा? माजी कुर्‍हाड गावली पायजे.’ लाकूडतोड्याने पण त्याच्या प्रामाणिक पूर्वजाची कहाणी ऐकलेली त्यामुळे त्याच्या मनात दांडग्या आशा!

देवदूताला पण हा इतर काहीच न बोलता पहिल्या फटक्यात आपल्याच पर्यायावर आल्याचा आनंद. देवदूत आपले उपरणे उतरवून विहिरीत उडी टाकण्याच्या बेतात आला. तेवढ्यात त्याला आठवले, people should take initiative in solving their own problem. तो एकदम मागे सरून म्हणाला, ’तुझी कुर्‍हाड मिळवायला पाहिजे हे बरोबरच आहे मग विचार कसला करतोस? टाक उडी विहिरीत. मी आहेच इथे तुला मार्गदर्शन करायला.’ देवदूताने केले.

लाकूडतोड्या चक्रावूनच गेला. विहिरीत उतरून सोन्या-चांदीची सोडाच पण हा लोखंडाची कुर्‍हाड पण देईना. पण तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली. ’देवा, काय सांगू, मला पवताच यीना. न्हायतर आतापावतर काय रडत बसलू असतू?’

’अरे, हे ही खरंच होतं. पण काही हरकत नाही. देवदूताने लाकूडतोड्याला स्वयंपूर्ण करून सोडायचा निर्णय घेतला. एखाद्याला मासे पकडून देण्याऐवजी मासे पकडायला शिकवणं चांगलं हे त्याला माहीत होतं. तो म्हणाला, ’चल आपण तुला पोहायला शिकवू. त्यासाठी मी चांगला resource person शोधतो.’

आता मात्र लाकूडतोड्याच्या निराशेचा कडेलोट झाला. काही मिळायचं तर सोडाच, हा नसतंच झेंगट गळ्यात घालतोय. तो एकदम चिडून खेकसला, ’अबे जा. म्हने पवायला शिकिवतोय. कलियुगातले देवपन साले बिघडलेत. पूर्वीचे देव किरपा करायचे, खरं बोलल्यावं बक्षिसी द्यायचे. आताचे येकदम फुडार्‍यावानीच बोलाया लागले.’

देवदूत बिचारा तोंडात बसल्यासारखा पुढे निघाला. आपल्या केसच्या अयशस्वितेची कारणं शोधत. तेवढ्यात त्याला धपकन आवाज आला. लाकूडतोड्याने विहिरीत उडी घेतली होती. काही वेळाने तो आपली कुर्‍हाड घेऊन चालता झाला होता. आता देवदूताला नवा प्रश्न पडला या
problem situation मध्ये आपल्या intervention ची गरज होती का?’



पुढे देवदूताने Problem situation मध्ये social work intervention ची गरज आहे का? याच विषयावर research  केला. त्याने त्याला भरपूर पैसा व प्रसिद्धी मिळवून दिली. त्यामुळे इमानेइतबारे त्याने आपला निष्कर्ष ’होय, problem situation मध्ये social work intervention ची गरज आहे.' असाच काढला!



9 comments:

  1. I did not know that even TISS (and institutes like TISS) has quota for Gods .. I had the other impression so far :-). You know what I mean and you know I always highlight TISS (and TISS like institutions) exceptions!

    A good humor .. you should label this as 'Development Satire' or may be just Development because many times development turns out to be Satire.

    And to laugh at ourselves is such a relief..

    ReplyDelete
  2. I am not aware of jargan words used in MSW colleges/institutes. But still enjoyed to read this blog.

    ReplyDelete
  3. :-)yes good satire, देव दानवा नरे निर्मिले हे खरेच त्यामुळे आता देवांनीही काळानुसार बदलायला हवे किंवा माणसाने त्यांना बदलले पाहिजे नाही का?
    child development dept पार्वतीकडे हे वाचून करमणूक झाली.

    उपरोध आवडला.

    ReplyDelete
  4. Aativas, Ravi, Preeti - Thanks for responding. Human societies, their value systems and human dynamics are reflected in mythologies. This story is an effort to depict a small yet imp portion of contemporary society.

    ReplyDelete
  5. Deepali says:
    तुझा लाकुडतोड्या लेख छानच जमलाय.
    Deepali thanks for your feedback

    ReplyDelete
  6. zakas! TISS cha Shikshan Saarthakee lawalas ho.. TISS chya social work methods mahde yachaa samawsh karayala hawa!

    ReplyDelete
  7. Too interesting! Mala attaparyant saglyat aawadli ti hi 'Lakudtodyachi Goshta'! Wachatana maja aali. Kharachach konitari goshta santay ani aapan aaiktoy asa watat hoata.
    I can't club the exact words to comment on the system you mentioned or the moral of the story, but still i enjoyed it as an interesting article.
    Lihit raha:)

    ReplyDelete
  8. Thanks Neelakshee!

    सीमा मी पामर काय TISS च्या शिक्षण पद्धतीत भर घालणार? तिथल्या शिक्षणानेच या पद्धती शिकवल्या नाही का? मला वाटते तू माझ्याशी स्वानुभवाने सहमत होशील. नंतरच्या प्रत्यक्षातल्या अनुभवातून त्यावर शिक्कामोर्तब होत गेलं इतकच.
    समाजकार्याची विद्यापीठेसुद्धा मार्केट च्या मागणीनुसार आपापले अभ्यासक्रम मोल्ड करून घेतात हे दुर्दैवी वास्तव माझ्यापेक्षा तू जास्त जवळून बघते आहेस.
    असो प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  9. hey watsaru,
    khupach chhan.. i think u touched it in very nice way... jus keep writin man! we need people like you.. why dont you think of civil services?

    ReplyDelete